कोकणी माणसाला माझा सस्नेह नमस्कार !!

असे म्हणतात की “कोकणची माणसे साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी,” या उक्ती प्रमाणेच अश्या प्रेमळ व संस्कारी मनांना ‘विवाह' या अतिशय नाजूक व भावनिक विषयाची तार छेडून एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.


आजचा कोकणी माणूस तसा बऱ्यापैकी शेती व शिक्षणाने प्रगत होऊन कोकणातच स्थिरस्थावर होतोय, तरीसुद्धा उच्चशिक्षण व नोकरी- धंद्यानिमित्त मुंबई- पुण्यासारख्या शहरात पर्यायाने जावेच लागत आहे.परंतु तेथे जाऊन शांत बसेल तो कोकणी माणूस कसला जिथे जाईल तेथे प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःच्या क्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करून नावारूपाला आला आहे.


एक गोष्ट मात्र प्रखरतेने सांगायची आहे ती म्हणजे वयानुरूप जेव्हा स्वतःच्या किवां मुला-मुलींच्या लग्नासाठी स्थळे पाहण्याची वेळ येते तेव्हा तो गणपती व होळीच्या सणांप्रमाणे गावची वाट पकडतो. तिथे जाऊन थोरा-मोठ्यांच्या, आप्तेष्टांच्या ओळखीतून स्थळे पाहण्याचा कार्यक्रम चालू होतो.त्यातच नोकरी व व्यवसायाची वेळ सांभाळून वारंवार हवी तशी स्थळे पाहण्यासाठी गावी जाणे शक्य होत नाही.परंतु आता स्थळांची चिंता करण्याचे काहीच कारण उरले नाही,माउली विवाह संस्था तुमच्यापर्यंत अगदी तुमच्या घराशेजारील ते प्रत्येक नात्यागोत्यातील ( गावाकडील तसेच शहरातील ) तुम्हाला अनुरूपस्थळांची माहिती संस्थेच्या www.maulivivahsanstha.com या वेबसाईटच्या माध्यमातून अगदी घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध करून देत आहे.सोबतच आजच्या तरुणाईला कोठेही आणि केव्हाही झटपट हाताळण्यासाठी संस्थेने MAULI VIVAH SANSTHA हे Android Application उपलब्ध करून दिले आहे.

एवढ्या आत्मविश्वासाने बोलण्याचे कारण म्हणजे संस्थेच्या शाखा (सिंधुदुर्ग-सावंतवाडी, पुणे – सिंहगड रोड) येथे असल्यामुळे कोकणातील व कोकणातून शहरात स्थायिक असलेल्या स्थळांची नोंदणी होत असल्याने जास्तीत जास्त स्थळे उपलब्ध होतात. त्यामुळेच माऊली विवाह संस्थेशी जोडलेल्या प्रत्येकाला अनुरूप स्थळे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम मागील अनेक वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे राबवत आहोत.