Home > About Us

प्रिय कोकणकर सस्नेह नमस्कार !!

     असे म्हणतात की “कोकणची माणसे साधीभोळी , काळजात त्यांच्या भरली शहाळी ,” या उक्ती प्रमाणेच अश्या प्रेमळ व संस्कारी मनांना ‘विवाह ‘ या अतिशय नाजूक व भावनिक विषयाची तार छेडून एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत
    आजचा कोकणी माणूस तसा बऱ्यापैकी शेती व शिक्षणाने प्रगत होऊन कोकणातच स्थिरस्थावर होतोय तरीसुद्धा उच्चशिक्षण व नोकरी- धंद्यानिमित्त मुंबई- पुण्यासारख्या शहरात जाऊन स्वताच्या हिमतीवर प्रामाणिकपणे स्वतःचे अस्तित्व निर्माण करून नावारूपाला आलाय पण जेव्हा स्वता किवा मुलांसाठी स्थळे पाहण्याची वेळ येते तेव्हा तो गणपती व होळीच्या सणांप्रमाणे गावची वाट पकडतो तिथे जाऊन थोरा-मोठ्यांच्या, आप्तेष्टांच्या ओळखीतून स्थळे पाहण्याचा कार्यक्रम चालू होतो त्यातच नोकरी व व्यवसायाची वेळ सांभाळून वारंवार हवी तशी स्थळे पाहण्यासाठी गावी येणे शक्य होत नाही.परंतु आता स्थळांची चिंता करण्याचे काहीच कारण उरले नाही आमची संस्था तुमच्यापर्यंत अगदी तुमच्या घराशेजारील ते प्रत्येक नात्यागोत्यातील ( गावाकडील तसेच शहरातील ) तुम्हाला अनुरूप हजारो स्थळांची माहिती संस्थेच्या website व android application च्या माध्यमातून अगदी घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध करून देत आहे.
    एवढ्या आत्मविश्वासाने बोलण्यामागे दोन प्रमुख करणे आहेत १) मुख्य ऑफिस कोकणात असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात असणे २)संस्थेचे प्रतिनिधी प्रत्येक गावापासून ते तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापासून ते महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये १६+ शाखांमार्फत“ कोकणी माणूस जिथे जिथे माऊली विवाह संस्था तिथे तिथे ” याप्रमाणे संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक सभासदाला जास्तीत जास्त कोकणी स्थळे उपलब्ध करून देण्याचा आम्ही जणू विडाच उचलला आहे !

Our Successful Stories

"We have found our life partner through Mauli Vivah Sanstha. It is a fantastic matrimonial portal for getting a suitable bride or groom. We highly recommend this website to everyone"

माऊली विवाह संस्थाच का ?

 • संस्थेमध्ये कोकणातील वधुवरांची नोंदणी केली जाते .
 • प्रत्येक गावापासून ते तालुक्यापर्यंत ,जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील १६ शाखांमार्फत जिथे जिथे कोकणी माणूस स्थायिक झालाआहे तिथपर्यंत सेवा देणारी एकमेव संस्था .
 • संस्था संपूर्ण कोकणी समाजातील उच्च शिक्षितांना प्राधान्यक्रम देण्यासोबतच अल्पशिक्षित स्थळांची सुद्धा नोंदणी करून घेते .
 • स्थळांच्या माहितीसाठी dynamic website तसेच mobile application ची सोय संस्थेने करून ठेवली आहे .
 • Website व application च्या माध्यमातून search optionमध्ये जाऊन सभासदांचे वय ,उंची ,शिक्षण ,फोटो ,मूळ गाव व सध्या राहण्याचे ठिकाण तसेच नोकरी व व्यवसायाचे ठिकाण यांची माहिती घेऊ शकता .
 • संस्थेच्या माध्यमातून वधू –वर व पालकांसाठी प्रत्येक जाती ,विभाग व स्थळांच्या वर्गीकरणानुसार थेट-भेट कार्यक्रमआयोजित केले जातात .
 • पालकांसाठी उपयुक्त असे वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमार्फत केले जाते .
 • स्थळांसोबत live chat ची सोय applicationच्या माध्यमातून उपलब्ध आहे .
 • स्थळ आवडल्यास Send Interest च्या माध्यमातून आपला इंटरेस्ट समोरील स्थळालाsmsच्या माध्यमातून लगेच पाठवला जातो .
 • संस्थेमार्फत ज्यांचे विवाह जुळले आहेत त्यांना वेबसाईटवर success stories optionमध्ये जाऊन पाहण्याची सोय उपलब्ध आहे .
 • संस्थेमध्ये हजारो स्थळांचा dataउपलब्ध असल्यामुळे व मुंबई पुण्यासारख्या सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे मुलामुलींना व त्यांच्या पालकांना इतर विवाहसंस्थामध्ये नावनोंदणी करण्याची गरज भासणार नाही .
 • मुलामुलींना लग्नाअगोदर व लग्नानंतर लागणारे समुपदेशन व वैद्यकिय सल्ला संस्थेमार्फत उपलब्ध आहे .
 • संस्था ID प्रूफ verify करूनच मेम्बर रजिस्टर करते.
 • संस्थेमधील रजिस्टर मेम्बर व्यतिरीक्त इतर कोणीही तुमचे प्रोफाईल पाहू शकत नाही.

"लाल मातीच्या संस्कृतीचा व संस्कारांचा वसा जपणारी एकमेव संस्था !!!"

Your story is waiting to happen! Get started