संस्थेचे नियम व अटी
- माऊली विवाह संस्थेत कोकणातील व कोकणातून शहरात स्थाईक झालेल्या शिक्षित, उच्चशिक्षित प्रथम, घटस्पोटीत, विधवा, विधुर वधु-वरांची नोंदणी केली जाते.
- संस्थेत नाव नोंदणी मोफत * आहे, परंतु संस्था महिना / अर्ध वार्षिक / वार्षिक / लग्न जमेपर्यंतची वेगवेगळ्या मेंबरशिप प्लॅनची फी आकारते. संस्थेत एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत केली जात नाही.
- संस्थेत नोंदणी फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे वेगळे चार्जेस आकारले जात नाहीत.
- सभासदांनी रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये योग्य ती संपूर्ण माहिती भरून लेटेस्ट photo upload करावा व ID proof क्रमांकच्या कॉलम मध्ये ID क्रमांक भरावा.
- संस्थेच्या कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी झालेल्या स्थळांची माहिती २४ तासात website वर टाकली जाते.
- सभासदांना स्थळे शोधण्यासाठी संस्थेकडून संपूर्णपणे सहकार्य केले जाते. त्यासाठी संस्थेच्या 7776000071/7522990099 या क्रमांकावर किवां प्रत्यक्षरित्या शाखा कार्यालयात सकाळी १०.००
ते संध्याकाळी ०६.०० पर्यंत सुट्टीचा वार सोडून संपर्क करून अनुरूप स्थळांची माहिती घेता येते.
- वेबसाईट वरील काही ठराविक माहिती वगळता तुमचा फोटो तसेच इतर माहिती add /edit करण्यासाठीoptions उपलब्ध आहेत.
- संस्थेमार्फत विवाह जमल्यास किंवा स्वप्रयत्नाने जमल्यास तसे संस्थेच्या कार्यालयात इमेल/ फोन / whatsapp (maulivivah@gmail.com / 7776000071) मार्फत कळवावे, यामुळे तुम्हाला
संस्थेकडून व सभासदांकडून वारंवार फोन किवा इमेल येणे बंद होईल.
- संस्थेकडून मिळालेल्या सभासदांच्या माहितीचा गैरवापर केल्यास संबंधित व्यक्तीचे सभासद्त्व रद्द करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
- स्थळांनी दिलेली सर्वच माहिती खरी असेल याची हमी संस्था देऊ शकत नाही, त्यामुळे आपण घेतलेल्या स्थळांची खातरजमा आपले नातेवाईक, मित्रमंडळी किवां विश्वासू यांच्यामार्फत करून घेणे,
भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास संस्था जबाबदारी घेणार नाही ती जबाबदारी सभासदांचीच राहील.
- पालकांनी स्वतः मुला – मुलींची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता, तसेच त्यांच्या आशा अपेक्षा लक्षात घेऊन योग्य स्थळे निवडावीत.
- नावनोंदणी झाल्यावर मुला-मुलींचा विवाह जमेलच किवां ठराविक दिवसात जमेल याची हमी संस्था देऊ शकत नाही.